तुळजापूर प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड येथील मठाधिपती श्री माधवानंद स्वामी महाराज यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिराला भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी श्री माधवानंद स्वामी महाराजांचा यथोचित सन्मान केला व त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट म्हणून प्रदान केली. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.