गणेशभक्तांच्या उत्सवाचा शुभारंभ – राजा कंपनी तरुण मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

"श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती " या घमघमीत निनादात ओळखले जाणारे राजा कंपनी तरुण मंडळ पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या तयारीला सज्ज झाले आहे. मंडळाच्या वार्षिक नियोजन बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवाची दिशा ठरविण्यात आली.

या बैठकीत अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र (गंप्पु) इंगळे होते, तर मार्गदर्शक म्हणून श्री. सज्जनराव साळुंके आणि मंडळाचे ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी नवीन दमदार कार्यकारिणी जाहीर करण्यात आली:


🔸 अध्यक्ष : श्री. गणेश (भाऊ) साळुंके

🔸 उपाध्यक्ष : श्री. जयराज (अण्णा) भोसले

🔸 उपाध्यक्ष : राहुल (भैय्या) भालेकर

🔸 कोषाध्यक्ष : अमोल (काका) गरड

🔸 सहकोषाध्यक्ष : हरीष साळुंके

🔸 सचिव : संकेत घोगरे

🔸 सहसचिव : गणेश मस्के


नवीन कार्यकारिणीच्या स्वागतासाठी मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व जयघोष करण्यात आला. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.


गणेशोत्सव 2025 मध्ये मंडळातर्फे समाजोपयोगी उपक्रम, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट पाहायला मिळणार असल्याचे संकेत मंडळाने दिले आहेत.

तुळजापुरात गणेशभक्तांसाठी हा उत्सव नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top