तुळजापूर प्रतिनिधी
आई श्री तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांसाठी आयोजित उज्जैन – श्री महाकाल, श्री घृष्णेश्वर, श्री ओंकारेश्वर व श्री काळभैरवनाथ दर्शन यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
या यात्रेत तब्बल ५४५ माता-भगिनींनी सहभाग घेतला. भाविकांच्या सोयीसाठी ९ ट्रॅव्हल्स बस व १० कार अशी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण यात्रा सुसूत्र नियोजन व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाची झळाळी उमटली.
नगरसेवक श्री सुनील (पिंटू) संभाजीराव रोचकरी यांच्या पुढाकारातून ही यात्रा साकार झाली. त्यांनी सांगितले की – “या यात्रेत सहभागी झालेल्या माता-भगिनींनी आमच्यावर दाखवलेला विश्वास व दिलेले सहकार्य अमूल्य आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हा उपक्रम भव्य व यशस्वी झाला. तसेच आमच्या मित्र-परिवारासह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनीही नगरसेवक रोचकरी यांचे मनापासून आभार मानले व अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन पुढेही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.