तुळजापूर प्रतिनिधी
आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तुळजापूर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी तालुका समादेशक अधिकारी रणजित रोकडे, पलटण नायक राघव गायकवाड, महादेव सोनवणे, दिलशाद बागवान मॅडम तसेच सर्व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात विविध प्रकारची रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
अशा उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी पलटण नायक राघव गायकवाड यांनी सांगितले.
