न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप; तेरखेड्यातील व्यक्तीविरुद्ध गुन्हा

mhcitynews
0



कळंब प्रतिनिधी 

तहसील कार्यालयात अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट व खोटी साक्षांकित नक्कल तयार करून त्यावर शासकीय शिक्क्यांचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गौतम रंगनाथ कुंभार (रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तहसील कार्यालय कळंब येथील सहाय्यक महसूल अधिकारी तथा अभिलेखपाल विद्या किशोर रणदिवे (वय ५०) यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, आरोपीने १३ मे २००९ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तहसील कार्यालय कळंब येथे अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट व खोटी साक्षांकित प्रत तयार केली. या कागदपत्रावर शासकीय शिक्क्यांचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप आहे. तसेच ही कथित बनावट कागदपत्रे वाशी येथील न्यायालयातील दिवाणी दावा क्र. ९०/२००९ मध्ये सादर करून शासनाची तसेच न्यायालयाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top