तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या आणि दुचाकीच्या समोरासमोर घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक व महिला जागीच ठार झाल्याची घटना दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिंधफळ बायपास येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रुपाली अनिल मनुरे वय ४० वर्ष तर सुधिर कुमार गणपत कोळी वय ३१ वर्ष दोघे रा.सर्वोदय नगर सोलापूर. हे आपल्या टू व्हीलर एमएच 13 डीडी 3392 सोलापूर तुळजापूर बायपास क्रॉस करून जात असताना अहमदपूर कडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 20 बी एल 1999 बसने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना तुळजापूर सोलापूर मार्गांवरील खपले वस्ती येथील बायपास रोड येथे झाली. अपघात पुढील चाकाखाली चिरडल्याने दुचाकी चालक हा 100 फूट दुर फेकला गेल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी यावेळी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सई भोरे - पाटील,पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील कुमार चव्हाण,पोलीस नाईक दिलीप राठोड,हे तातडीने घटनास्थळी दाखल झाली.बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

