यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांची फौज !
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून. त्यात तुळजापूर तालुक्यातील 48 गावांमध्ये निवडणुकीला रंग चढू लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत असून ज्येष्ठांना यंदा निवडणुकीत तरुणांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स हॉल येथे पाहायला मिळाली.
तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी इच्छुक उमेदवारांची सकाळपासूनच स्पोर्ट्स हॉल येथे लगबग दिसून आली एकूण 418 जागेसाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकच अर्ज दाखल झाले असून. तर सरपंच पदासाठी एकाही उमेदवाराने पहिल्या दिवशी आपले अर्ज दाखल केले नाही.
या निवडणुकीत उच्च शिक्षित तरुण, तरुणी आपले नशीब अजमावण्यास इच्छुक असून येणाऱ्या निवडणुकीत जनता कुणाला पसंती देते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणारच आहे.
.jpeg)

