अवैध मद्य विरोधी कारवाई या चार ठिकाणी टाकले छापे

mhcitynews
0

 

उस्मा

संग्रहीत 

उस्मानाबाद प्रतिनिधी  

जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 29.11.2022 रोजी 04 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेली सुमारे 750 लि. गावठी दारु, व देशी- विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त केले. या जप्त मद्याची एकुण अंदाजे 16,175 रुपये  किंमत असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

यामध्ये ढोकी पो.ठा. च्या पथकाने कोल्हेगाव येथे 23.10 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- बाबुलाल श्रीरंग चव्हाण हे गावातील शिराढोन रस्त्याकडेला 720 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.

तर तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने लातुर ते तुळजापूर रस्त्यालगतच्या मल्हार धाब्यावर 20.30 वा. सु. छापा टाकला असता काक्रंबा ग्रामस्थ- धम्मपाल अंकुश पांडागळे हे देशी- विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. व उमरगा पो.ठा. च्या पथकाने झोपडपट्टी, तुरोरी येथे 17.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- उषा शिवाजी लिंबोळे या आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना पथकास आढळल्या. तसेच परंडा पो.ठा. च्या पथकाने शहरातील कोटला मैदान परिसरात 19.20 वा. सु. छापा टाकला आसता तेथील ग्रामस्थ- ज्योती दिपक पवार या 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top