![]() |
| संग्रहीत |
तुळजापूर प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने दिनांक ०९/११/२०२२ च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे दिनांक २८/११/२०२२ ते दिनांक ०२/१२/२०२२ या कालावधीत संगणक प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोग नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (off line) स्वीकारण्याची परवानगी देत आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ दिनांक ०२/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारीक पध्दतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना द्यावेत. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छूक उमेदवारांना उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची व्यापक प्रसिध्दी स्थानिक पातळीवर देण्यात यावी. तसेच पारंपारीक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO Login मधून भरून घेण्यात यावे असे राज्य निवडणूक आयुक्तानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हणटले आहेत.
.jpeg)
