शालेय जिल्हास्तर साॅफ्ट टेनिस स्पर्धा ४ डिसेंबर २२ ला होणार

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

उस्मानाबाद जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा ४ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.


ही स्पर्धा १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ही स्पर्धा १४ डिसेंबर २०२२ ऐवजी ४ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत.

तालुका क्रीडा संकुल, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे ही स्पर्धा संपन्न होत आहे. तरी या बदलाची सहभागी खेळाडूंनी आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, अनिल धोत्रे, तालुका संयोजक बिलकुले सर, सचिव सिराज शेख, यांच्याशी संपर्क साधावा, असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top