अखेर राज्य सरकारने निधी मंजूर केला
तुळजापूर प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूरकर सोलापूर तुळजापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग जोडावा यासाठी मागणी करत होते गेल्यावर्षी केंद्र सरकारने मंजुरी दिली होतीच अखेर भाजप शिंदे सरकारने मंगळवार दिनांक 29 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद फास्ट ट्रॅक रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा वाटा ४५२ कोटी ४६ लाख रुपये देण्यासाठी मंत्रीमंडळाची मंजुरी या निर्णयामुळे तुळजापुरात आनंदाचे वातावरण पसरले.या राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता तुळजापूरच्या लवकरच स्वप्न पूर्ण होईल व रेल्वे तुळजापूर वरून धावेल.
.jpeg)