दोन सुवर्ण, एक रजत पदकासह चार कांस्य पदकांची कमाई
प्रतिनिधी तुळजापूर
सातारा येथे पार पडलेल्या ७ वी ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद संघाने वैयक्तिक आणि सांघीक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण, एक रजत पदकासह चार कांस्य पदकांना गवसणी घातली.
महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि सातारा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान सातारा येथे ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याने घवघवीत यश संपा
दन केले. या स्पर्धेत उस्मानाबाद संघाने एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी स्पर्धेत दोन सुवर्ण पदक, एक रजत पदकासह चार कांस्य पदकांची कमाई केली.
मुलींच्या एकेरी स्पर्धेत प्रियांका किरण हंगरगेकर हिने सुवर्णपदक पटकावले. तर मुलांच्या एकेरी स्पर्धेत यशराज हुंडेकरी याने रजत पदकाची तर आदित्य सापते याने कांस्य पदकाची कमाई केली.
मुलांच्या दुहेरी स्पर्धेत स्वराज देशमुख व कृष्णा थिटे यांनी कांस्य आणि करण खंडाळकर, यश हुंडेकरी यांनीही कांस्य पदक पटकावले.
मिश्र दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर व यशराज हुंडेकरी यांनी कांस्य पदक पटकावले.
सांघीक कामगिरीसाठीचे सुवर्ण पदक मुलांच्या संघास प्राप्त झाले. यात वरील खेळाडूंसह सुयश आडे, प्रथमेश अमृतराव, समर्थ शिंदे हे खेळाडू सहभागी होते.
या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत काबंळे, राहुल जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे आणि सचिव सिराज शेख यांनी परीश्रम घेतले.
या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


