तुळजापूर प्रतिनिधी
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाणे तुळजापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मा.नगरसेवक विशाल रोचकरी, आनंद पांडागळे,औदुंबर कदम, तानाजी कदम, विजय कंदले, किशोर साठे, आनंद कंदले, प्रकाश कदम, तानाजी कदम ,दाजीबा कदम, अरुण कदम, प्रताप कदम, बाळू डावरे ,महादेव सोनवणे ,अरविंद कदम ,विशाल कदम, दीपक कदम ,पुष्पराज कदम, झोंबाडे साहेब ,विजय सोनवणे, विजय गायकवाड, गोपाळ सोनवणे व भीम नगर सिद्धार्थ नगर मधील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
