तुळजापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला !

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तालुक्यातील माळुंब्रा, कुन्सावळी, लोहगाव,गुजनुर, पांगरवाडी,बोळेगाव, ढेकरी, सलगरा मुड्डी,सागवी मार्डी,चिवरी उमरगा, निलेगाव,शिरगापुर या 12 गावच्या सरपंच पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे वर्चस्व सिद्ध करत मोठ्या फरकाने सत्ता काबीज करण्यात यश प्राप्त केले असून महाविकास आघाडी अनेक ठिकाणी सरपंच व ग्रा,प,सदस्य निवडून आणले आहेत.


शिवसेनेचे विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे पवार, उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर,सुनील जाधव,प्रमुख सिद्धराम आप्पा कारभारी,चेतन बंडगर,बालाजी पांचाळ,सोशल मीडिया प्रमुख भिवाजी सावंत इत्यादी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top