दहा फेऱ्यात होणार 48 ग्रामपंचायतीची मोजणी

mhcitynews
0


फेरी निहाय ग्रामपंचायतीची यादी 


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून एकूण दहा फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. दुपारपर्यंत सर्व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

तुळजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निकालानंतरही तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व घटकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त  करण्यात आल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुक विभागातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे ही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


फेरीनिहाय ग्रामपंचायती

पहिली फेरी : धोत्री, हंगारगा तूळ, चव्हाणवाडी, चिवरी, अपसिंगा 

दुसरी फेरी : तीर्थ बु, वडगाव लाख, मसालाखुर्द, उमरगा चिवरी, खुदावाडी, बोरी 

तिसरी फेरी : बोळेगाव, सलगरा मड्डी, सारोळा, होनाळा, कुंसावळी, लोहगाव 

चौथी फेरी : देवसिंगा नळ, चिकुंद्रा, गुजनूर, देवसिंगा तूळ, निलेगाव, मानेवाळी

पाचवी फेरी : शिरगापूर, वागदारी, दहिटना, गुळहळळी, वानेवाळी, गंजेवाडी

सहावी फेरी : केशेगाव, अरबळी, पांगरधरवाडी, सांगवी काटी, खंडाळा, मोरडा,

सातवी फेरी : ढेकरी, बोरनदिवाडी नळ,कार्ला, सांगवी मार्डी, केमवाडी, माळुब्रा

आठवी फेरी : काक्रंबा, मूर्टा, जळकोटवाडी सा, नांदगाव

नववी फेरी : सावरगाव, काटी

दहावी फेरी : काटगाव 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top