सरंपचानंतर आता कौन बनेगा उपसरपंच ?

mhcitynews
0

या तारखेला होणार उपसरपंच पदाची निवड 

तुळजापूर प्रतिनिधी 

तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर रोजी पार पडल्या निकाल ही जाहीर झाला आता तालुक्यातील उपसरपंचाचा निवडी ५ व ६ जानेवारी रोजी होणार आहेत. त्यामुळे आता उपसरपंच पदाच्या निवडी गावपातळीवर होणार असून सरपंचानंतरचे महत्वाचे पद असल्याने कौन बनेगा उपसरपंच? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उत्सुकता वाढली असल्याचे चित्र आहे.

५ जानेवारीस २४ ग्रामपंचायती व उर्वरित २४ ग्रामपंचायतीचा उपसरपंच निवडी ६ जानेवारी रोजी होणार आहेत. उपसरपंच निवडी साठी २४ निरीक्षकांच्या नियुक्त्या तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी सौदागर तांदळे यांनी जाहीर केल्या आहेत. एका निरिक्षकाकडे दोन ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

५ जानेवारी

धोत्री, चव्हाण वाडी, काक्रंबा, तीर्थ बु. मसला खु. बोळेगाव,काटी, सारोळा, कुन्सावळी, निलेगाव, देवसींगा नळ आपसिंगा, गुजनुर, नंदगाव, शिरगापूर, खुदावाडी, दहिटना, वानेगाव, केशेगाव, पांगरदरवाडी, मुर्दा, खंडाळा, ढेकरी, कार्ला

६ जानेवारी

हंगरगा तुळ, चिवरी, माळुंब्रा, वडगाव लाख, उमरगा चिवरी, सलगरा मड्डी, काटगाव, होनाळा, लोहगाव, मानेवाडी, चिकुंद्रा, केमवाडी, देवसींगा तुळ, सावरगाव, वागदरी, बोरी, गुळहळ्ळी, गंजेवाडी, आरबळी, सांगवी काटी, जळकोटवाडी सा., मोर्डा तडवळा, बोरनदवाडी नळ, सांगवी मार्डी


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top