शालेय क्रीडा स्पर्धेत टेलरनगर प्राथमिक प्रशाळेचे यश

mhcitynews
0


प्रतिनिधी रजाक शेख 

तालुक्यातील टेलरनगर जिल्हा परिषद प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा विभागाच्या वतीने अणदूर बिटस्थरीय घेण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत यश संपादित केले.

शालेय स्पर्धा या विद्यार्थ्यांना आपल्या मैदानी खेळात नैपुण्य दाखवण्यासाठीची संधी असते, टेलरनगर प्राथमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल

विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक गाडेकर गुरुजी, शालेय समितीच्या अध्यक्ष खंडू क्षिरसागर, यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय समितीचे माजी अध्यक्ष रजाक शेख, पोलीस पाटील विजय वाघमारे, हनीफ मुल्ला, दाऊद पटेल, बादशा पटेल अनिल वाघमारे वर्गशिक्षक संतोष आशापुरे व विद्यार्थि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top