तुळजापूर प्रतिनिधी
सन 2022 मध्ये तुळजापूर तालुक्यातील तसेच उस्मानाबाद जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळणे बाबत दि. 13 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
शासनाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा भरलेल्या पिकवीम्याची रक्कम ही सदर पिकविमा कंपनीने काही शेतकऱ्यांना दिलेली असुन, अनेक शेतकरी पिकविमा मिळणेपासुन वंचित आहेत. सदर पिकविमा कंपनीस सर्व शेतकऱ्यांचा पिकविमा रक्कम तात्काळ देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळवुन देण्यास सहकार्य करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर रोजी जुने बस स्थानक तुळजापूर समोर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे नमूद केले आहे.
यावेळी जिल्हाअध्यक्ष रविंद्रइंगळे, धनाजी पेंदे, राजु हाके, गुरुदास भोजने, विकास मारडे, निलैश घाटे, अदिनाथ काळे, प्रदीप जगदाळे, विकास भोजणे, रत्नेश घाटे, अमर भोजने, संतोष भोसले अदि पदाधिकारी उपस्थित होते.
