तुळजापूर प्रतिनिधी
बावी, ता. भुम येथील- अनिल श्रीधर पिंपळे, वय- 50 वर्षे हे दि. 05.12.2022 रोजी 17.00 वा. सु. बावी गट क्र. 259 मधील शेतातील शेत रस्त्यावर मुरुम टाकत होते. यावेळी गावकरी- विशाल पिंपळे यांनी तेथे जाउन शेतरस्त्यावर मुरुम टाकल्याच्या कारणावरुन अनिल यांना शिवीगाळ करुन कोयत्याने त्यांच्या कपाळावर मारुन अनिल यांना जखमी केले. तसेच यावेळी सुखदेव पिंपळे, अमर पिंपळे, राम पिंपळे दत्तात्रय पिंपळे या ग्रामस्थांनीही अनिल यांना लोखंडी गजाने मारहान केली. दरम्यान अनिल यांच्या बचावास त्यांची पत्नी व मुलाने धाव घेतली असता त्यांसही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल पिंपळे यांनी दि. 11.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)