अपसिंगा येथील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सत्कार

mhcitynews
0


तूळजापूर प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अपशिंगा ग्रामपंचायतचे नूतन सरपंच अजित अभिमन्यू क्षीरसागर सदस्य बालाजी नागनाथ पांचाळ, चंद्रकांत भागवत डांगे, शशांक रोकडे, नागेश कोल्हे, विकास डांगे, सौदागर गोरे, गुलाब गोलकर, ऋषी पाटील, हनुमंत गोलकर, सोनू पाटील, राजाभाऊ दिवटे, शक्तिमान पांडागळे,सागर रोकडे, विजय सोनवणे, संजय सुरवसे, राजेंद्र क्षीरसागर व सरपंच व सदस्य राष्ट्रवादी अपसिंगा येथील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचा भव्य सत्कार करून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


सत्कार समारंभ प्रसंगी अपसिंगा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंचायत समिती सदस्य भागवत क्षीरसागर यांचाही सत्कार गोकुळ तात्या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे ज्येष्ठ नेते खंडोजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते बाळासाहेब चिखलकर व गोविंद देवकर उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top