बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

तालुका विधी सेवा समिती तुळजापूर व विधीज्ञ मंडळ तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ डिसेंबर  रोजी दुपारी २.०० वाजता तुळजापूर येथील जिल्हा परीषद कन्या प्रशाला, तुळजापूर येथे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयी जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तथा  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा.मिलींद म.निकम हे होते.

प्रमुख प्रवक्ते म्हणून विधीज्ञ श्रीमती अंजली साबळे यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयी सखोल मार्गदर्शन करून मुलींनी आपल्या लहान वयात सामाजिक जीवन जगत असतना कोणत्या प्रकारे काळजी घ्यावयाची व त्यावर कशाप्रकारे मात करावयाची याविषयी मुलींच्या शारीरीक व मानसीकतेत कशाप्रकारे बदल घडला जातो व त्याचा गैरफायदा समाजातील कशाप्रकारे घेतात याविषयी त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष मिलींद म. निकम यांनीदेखील मुलींनी समाजात आपला मानसन्मान व बाललैंगिक अत्याचार कायद्याविषयी जनजागृती विषयी माहीती दिली. तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा विषयाचे मार्गदर्शन मुलींबरोबर मुलांनाही देणे आवश्यक आहे त्यांनादेखील याचे ज्ञान करून देणे गरजेचे आहे. तसेच जर एखाद्यावर अशाप्रकारे अत्याचार होत असेल तर याची माहीती आपल्या शिक्षकांना तसेच आपल्या पालकांना तात्काळ देण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर जर आपल्यावर अशाप्रकारचा अत्याचार झाला तर यावर कोणत्याप्रकारे कार्यवाही करावी याचे ही मार्गदर्शन उपस्थित मुलींना केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परीषद कन्या प्रशाला तुळजापूर येथील विद्यार्थीनींना शालेय साहीत्याचे वाटप करून आपले अध्यक्षीय भाषण संपविले.

यावेळी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष डि.जे. घोडके, विधीज्ञ श्रीमती. पवार, विधीज्ञ  शुभम झाडपिडे, विधीज्ञ सचिन भांजी जिल्हा परीषद कन्या प्रशालेतील मुख्याध्यापक अंकुश कुंभार सर  शिक्षक व शिक्षीकावृंद, तुळजापूर न्यायालयातील विधीज्ञ, तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऍड. एस. डी. लोंढे यांनी तर आभार प्रदर्शन कनशेट्टी सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top