तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ७ व ८ डिसेंबर या दोन दिवशीय इंडक्शन प्रोग्राम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .या कार्यशाळेचे उद्घघाटन बुधवारी सकाळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता राजेंद्र मायनाळ सोलापूर यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य रवी मुदकांना यांच्या उपस्थित झाले. प्रारंभी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आला. यानंतर महाविद्यालयाच्यावतीने राजेंद्र मायनाळ यांचे स्वागत प्राचार्य रवी मुदकना व समन्वयक प्राध्यापक रवींद्र कामे यांनी केले. प्रास्ताविकेत प्राचार्य मुद्कना यांनी दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून या कार्यक्रमामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांना आधुनिक ज्ञान मिळून त्यांच्या गुणवत्तेत भर पडण्यास मदत होणार आहे असे सांगितले .यानंतर राजेंद्र मायनाळ यांनी अध्यात्म या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माची गरज ?अध्यात्मामुळे कशाप्रकारे मानसिक समाधान लाभते ? अध्यात्मामुळे माणसाची प्रगती कशी होते? त्याला शिस्त कशी लागते ? याविषयी माहिती देऊन महानतपस्वी कुमारस्वामी यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात अभियंता अतुल मराठे यांनी उद्योग 4.0 यावर मार्गदर्शन केले. सद्यस्थितीतील उद्योगधंदे व पूर्वीचे उद्योगधंदे यामध्ये अमुलाग्र झालेले बदल. आजच्या उद्योगधंद्यात माणसापेक्षा तंत्रज्ञानाला कसे महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्योगधंद्यामध्ये डिजिटलेशन कशाप्रकारे झाली आहे? याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उद्योगधंद्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सांगितले. अभियंता अशोक रानडे यांनी सामाजिक उपयोगितेसाठी तंत्रज्ञानाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या युगात तंत्रज्ञानाची झालेली प्रगती? त्यात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती व त्याची समाजातील व्यक्तींसाठी कशाप्रकारे गरज आहे. त्याची कशी उपयुक्तता आहे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रिया सुरवसे यांनी केले तर आभार विभाग प्रमुख प्रा. संजय सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रबंधक सुजाता कोळी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख समन्वयक प्रा. रवींद्र कामे, प्रा. दीपक शिंदे, प्रा. सचिन हजारे हे परिश्रम घेत आहेत.
