होमगार्ड वर्धापन सप्ताह निमित्त तुळजापूर शहरात स्वछता अभियान व रुग्णांना फळ वाटप

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

होमगार्ड ची स्थापना पूर्वीच्या बॉम्बे प्रांतात 1946 मध्ये झाली होती लष्कर, नौदल, वायुसेना आणि इतर सुरक्षा एजन्सी व्यतिरिक्त दोन स्वयंसेवी संस्था सिविल डिफेन्स आणि होमगार्ड कोणत्याही अप्रिय परिस्थितीत नागरिकांना संरक्षण देण्यासाठी उभे केले गेले त्यामुळे दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस देशभरात होमगार्ड व नागरी संरक्षण संघटनेचा स्थापन दिवस म्हणून साजरा केला जातो.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन सप्ताह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजन करून साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने येथील तुळजापूर पथक होमगार्ड कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून स्वच्छता अभियानास सुरूवात केली शहरातील नवीन बस्थानक व विविध ठिकाणी ही मोहीम घेण्यात आली. तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तुळजापूर तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी रोकडे सर, तुळजापूर कार्यालय प्रमुख सोनवणे सर सह होमगार्ड कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top