इतक्या भावी सरपंचांनी भरले आपले अर्ज सर्वाधिक अर्ज या ग्रामपंचायती मधून

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी  

तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या  सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन भरण्याच्या अखेर च्या दिवसा पर्यंत सरपंच पदासाठी तब्बल 252 भावी सरपंचानी  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले


यामध्ये सरपंच पदासाठी अखेरच्या दिवशी अपसिंगा ग्रामपंचायत  येथून सर्वाधिक 11 जणांनी मिळून असे एकूण 15 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ काक्रंबा येथून एकूण 13 तर काटी आणि सावरगाव येथून प्रत्येकी 11 भावी सरपंचानी  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


ग्रामपंचायत सदसयाच्या एकूण 418 जागेसाठी एकूण 1195 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.  यामध्ये सर्वाधिक 55 अर्ज काटी ग्रामपंचायत येथून आले तर सावरगाव येथून 46 तर अपसिंगा येथून 42 उमेदवारांनी आपले सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top