तुळजापूर न्यायलयात ई प्रणालीचे उदघाटन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी  

तुळजापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायलयातील ई प्रकरण  प्रणाली, विदिज्ञ मंडळातील संगणक,  ई ग्रंथालय,  ई मुद्देमाल विभाग, ई पुस्तक ग्रंथालय विभागाचे प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून  याचे उदघाटन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा समिती उस्मानाबाद मा श्रीमती अंजु एस.शेंडे मॅडम यांच्या प्रमुख शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री गुप्ता साहेब व तुळजापूर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश श्री मिलिंद एम.निकम साहेब, सह दिवाणी न्यायाधीश पि.जी.एस. चाळकर मॅडम, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री कुलकर्णी साहेब व उमरगा, परंडा, भुम, उस्मानाबाद येथील न्यायाधीश वर्ग उपस्थित होते.

महाराष्ट्रात हे पहिले न्यायालय असेल जे पेपरलेस काम सुरू करत असून असे उदघाटन प्रसंगी श्रीमती अंजु एस शेंडे मॅडम यांनी यावेळी सांगितले. तसेच सदरील प्रणाली बद्दलचे फायद्याचे महत्व ही त्यांनी यावेळी उपस्तितांना समजावून सांगितले.

तसेच तुळजापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी ज्येष्ठ विधीज्ञ के.डि. कुलकर्णी, तांबे साहेब, शेटे साहेब, पवार साहेब, ढवळे साहेब व महीला विधीज्ञ संगिता कोळेकर, उपाध्यक्ष शिला कोळेकर, अंजली साबळे, फुलारी मॅडम, शिंदे मॅडम, गायकवाड मॅडमसह विधीज्ञ संघाचे सदस्य उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top