महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
तुळजापूर प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत अभिवादन करून सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सरकाले सर ,सहशिक्षक लोकरे, गडेकर, शेख, मोरे, वसावे तसेच सिद्धार्थनगर येथील आकाश चौधरी, अजित कदम, सौरभ सोनावणे, मुकेश भांगे, ऋषिकेश सोनवणे, अमित कदम, अजित सोनावणे, संतोष सिद्धगणेश, कार्तिक चौधरी, अनिकेत चौधरी, अनिकेत सोनवणे, आत्माराम सोनवणे, सुनील भांगे, अण्णा जाधव आदी उपस्थित होते.
