मुलीच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट ; वारेमाप खर्चाला फाटा

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिंडेगाव येथील साखरे कुटुंबीयांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या ग्रंथालयाला शंभर दर्जेदार पुस्तके भेट दिली.

दिंडेगाव येथील रहिवाशी शिवाजी साखरे यांनी आपल्या मुलीचे सायली साखरे याच्या 10 व्या वाढदिवसाला अनावश्यक खर्चेला फाटा देत गावातील जिल्हा परिषद शाळेत 100 विविध शालेय उपयोगी पुस्तके देत वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या कन्येचा आनंद द्विगुणित करण्यासोबत समाजातील वाचनाची गरज ओळखून पुस्तकरूपी ज्ञानभेट देऊन एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे शिवाजी साखरे हे नांदुरी येथील  जिल्हा परिषद शाळेचे  मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top