१९ वर्षाखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई
तुळजापूर प्रतिनिधी
लखनौ (उत्तर प्रदेश) येथे पार पडलेल्या १७ वी नॅशनल ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत तुळजापूरची खेळाडू प्रियांका हंगरगेकर हिने दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.
नॅशनल सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने १७ वी ज्युनियर नॅशनल सॉफ्ट टेनिस स्पर्धा लखनौ ( उत्तर प्रदेश) येथे दि. ९ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकेरी व दुहेरी स्पर्धेत तीन कांस्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संजय नागरे, अभिषेक मानकर, हेमंत काबंळे, राहुल जाधव, संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, राज्य सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे आणि सचिव सिराज शेख यांनी परीश्रम घेतले. या यशाबद्दल प्रियांका हंगरगेकर हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
