तुळजापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या बालाघाट मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली आहे.
तुळजापूर नगरीत 17 डिसेंबर दुसरे रोजी राज्यस्तरीय बालाघाट मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे, या अगोदर प्रा.भास्कर चंदनशिव यांनी संमेलनाध्यक्ष पद भूषिवले आहे, गोरे यांनी दहा ग्रंथाचे लेखन केले असून शेतकरी आत्महत्या की हत्या,धर्माची दारू अन जातीची नशा,प्रेमा,प्रिये आदी ग्रंथाचा समावेश आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद श्री गोरे यांनी केला आहे.आजवर विविध विषयांवर हजारो व्याख्याने त्यांनी दिली आहे,प्रभावी वक्ते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत, रणांगण एक संघर्ष,उष:काल,ढोलकीच्या तालावर,प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या,आदी मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक केले आहे तसेच या चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे, युगंधर प्रकाशन संस्थेच्या वतीने त्यांनी आजवर 144 पुस्तके प्रकाशित केली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेली तीस साहित्य संवर्धनाचे कार्य करीत आहेत,आजवर अनेक संमेलनाचे संमेलनाध्यक्ष त्यांनी भूषिवले आहे,असे बहूआव्यामी व्यक्तीमत्वाची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,नुकतीच तुळजापूर येथे ज्ञानेश्वर पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड सर्वानुमते करण्यात आली, यावेळी साहित्य परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पालकर,प्रदेश संघटक अमोल कुंभार,तुळजापूर तालुका अध्यक्ष अनिल आगलावे, सचिव डॉ.अविनाश ताटे,कार्यवाहक राहुल दुलंगे आदी उपस्थित होते.
