ज्ञानसाधना सायन्स हब अभ्यासिकेचे उद्घाटन

mhcitynews
0

 

तुळजापूर प्रतिनिधी

कुठल्या ही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ् ऍड. एन. एम. कानडे साहेब यांनी रविवारी दि.1 जानेवारी रोजी ज्ञानसाधना सायन्स हब अभ्यासिकेचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले. तत्पूर्वी श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

सध्या अभियांत्रिकी (IIT JEE) आणि वैद्यकीय (NEET) उत्तम करिअरसाठी तरुणांची पहिली पसंती आहे. त्यामुळे या करिअर पर्यायांकडे तरुणांचा कल अधिक असून त्याकडे आकर्षित होतात. IIT आणि NEET निश्चितपणे देशाचे सर्वात कठीण परीक्षांपैकी एक. ज्यांच्यासाठी अनेक विद्यार्थी आधीपासूनच तयारी सुरू करतात . जे विध्यार्थी IIT मध्ये आणि NEET साठी चांगले कोचिंग मिळवण्याच्या विचारात आहेत त्यांच्या साठी तुळजापूरच्या इतिहासात प्रथमच देशपातळीवरील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट, आयआयटी-जेईई परीक्षा तसेच एमएचटी सीईटी यासारख्या प्रवेश पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना शांततापूर्ण व सर्व सुविधांनीयुक्त अशा अभ्यासिकेची सुरुवात ज्ञानसाधना सायन्स हब च्या वतीने तुळजापूर शहरात करण्यात आली.
यावेळी जेष्ठ विधिज्ञ् ऍड.एन. एम. कानडे साहेब, ऍड फारुख शेख,  रामचंद्र  गिड्डे अध्यक्ष रोटरी क्लब, पि. टी.ए  जिल्हाध्यक्ष तथा  प्रा. अण्णासाहेब म्हात्रे, पत्रकार अनिल आगलावे यांच्यासह ज्ञानसाधना सायन्स हब चे संचालक प्रा. राम माने, प्रा. शिवदर्शन उकरंडे., प्रा.सचिन भालेराव , सुरज व्हरकट , डॉ.निरंजन खराडे, तोसिफ शेख सह पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कु. मानसी मुळे याने केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top