तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त प्रतिवर्षा प्रमाणे मंगळवार (दि.३) रोजी जलयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपारीक रुढी परंपरेने या ही वर्षी श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने शाकंभरी मातेचा नवरात्र महोत्सावामध्ये पापनास तिर्थ ते श्री तुळजाभवानी मंदिर जलयात्रा सोहळ्यानिमित्त सुहासिणी, कुमारीका व आराधीनी यांना सुमारे पाच हजार कलश जलकुंभ वाटप, तर दिंडया, पताका, गोंधळी, आराधी, वारुवाले, धनगरी ढोल यांना निमंत्रीत केले आहे.
शांकभरी मातेची शाक प्रतिमा ( भाजीपाला ) व जलयात्रेचा कलश मिरवणुकीकरीता रथाची अद्यावत वाद्यासह. "अश्व व गजराज " व बँड व बँजो पथकाची व्यवस्था तर जलयात्रा सोहळ्यानंतर भवानी रोड, भाजी मंडई येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
