हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मारुती मंदिरामध्ये शिवसेना शाखा मंगरूळच्या वतीने गावातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

मंगरूळ येथील इंदिरा कन्या प्रशाला, जिल्हा परिषद हायस्कूल, प्राथमिक शाळा तसेच संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील 300 विद्यार्थ्यांना शिवसेनेचे सौदागर जाधव, श्याम पाटील, मनोज डोंगरे तसेच शिवसेना शाखेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख शामलताई वडणे पवार, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष सतीश खोपडे, सरपंच महेश डोंगरे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, तालुका उपप्रमुख सुनील जाधव, जयप्रकाश दरेकर, पुरुषोत्तम देशमुख, किसन डोंगरे, शिशिर खोपडे,विकास भोसले, मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे, चव्हाण सर, कोरे सर, उंबरे मॅडम, डोंबाळे सर, आशिष साठे, क्षीरसागर सर सह  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी शिवसैनिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top