वाहतुक पोलीस शाखेतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहा निमीत्त जनजागृती रॅली

mhcitynews
0


उस्मानाबाद प्रतिनिधी 

रस्ता सुरक्षा सप्ताहा निमीत्त उस्मानाबाद शहर वाहतुक पोलीस शाखा व जिल्हा व्यापारी महासंघ, एकता फाउडेशन व गणेश मंडळ उस्मानाबाद, सायली आय हॉस्पीटल उस्मानाबाद, संस्कृती प्रतिष्ठाण व नायगावकर क्लिनिक लॅब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जानेवारी २०२३ रोजी उस्मानाबाद वाहतुक पोलीस शाखेत मोफत नेत्र, शुगर तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यात पोलीस अधिकारी, अंमलदार व रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थितांना वाहतुक कायदा व नियम विषयी मार्गदर्शन करून रिक्षा रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. त्यानंतर रॅली शहर वाहतुक शाखा - गाडगे महाराज चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे फिरून वाहतुक पोलीस शाखा येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी उस्मानाबाद शहर पोनि श्री उस्मान शेख, वाहतुक पोलीस शाखेचे सपोनि- श्री. अमित मस्के, वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार, शहरातील मान्यवर संजय मोदानी, राजसिंह राजेनिंबाळकर, डॉ. गोविंद कोकाटे, अमित कदम, राम मुढे, शशीकांत करंजकर तसेच रिक्षा युनियनचे जल्लालभाई तांबोळी यांसह रिक्षा चालक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top