तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून पिकाची नोंद करणे आवश्यक - तलाठी अशोक भातभागे

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

तालुक्यातील रब्बी हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप-व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे.दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करावी. ई-पीक पाहणीचे ॲपमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी फक्त दोन तीन दिवस आहेत असे आव्हान तुळजापूर तलाठी अशोक भातभागे यांनी केले आहे.


तुळजापूर व हंगरगा तुळ , सिंदफळ, अमृतवाडी, येथील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, ई पीक पाहणी अँप व्हर्जन - २ मधून रब्बी हंगामाची पिकाची नोंद २ दिवसाच्या आत करून घ्यावी. आपण पिक पाहणी न केल्यास जमीन पडीक नोंद झाल्यास किंवा शासकीय लाभ न मिळाल्यास त्यास आपण स्वतः जबाबदार राहणार आहात तर सर्व शेतकरी वर्गांनी याची नोंद घ्यावी

तलाठी सज्जा तुळजापूर

अशोक भातभागे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top