तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील टी पी ओ अंतर्गत पुणे येथील क्यु -स्पायडर या कंपनीत विविध शाखेतील विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनियरपदी निवड झाली आहे. यासाठी कंपनीच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून विद्यार्थ्यांच्या अँप्यटीटयुडे टेस्ट घेऊन मुलाखतीतुन तेरा जणांची निवड करण्यात आली
यात संगणक शाखेचे उमादेवी कावरे, अजय शिंदे ,वर्षाराणी जोगदंडे, प्रीती गायकवाड, ज्योती सोनकांबळे, ऐश्वर्या करपे, ज्योती मगर, दूरसंचार व अनुवैजिक शाखेतील दिव्या गाटे, किरण सुतार, स्थापत्य शाखेतील वैष्णवी जाधव, अंजली गडकर, यांत्रिकी शाखेतील शुभम बिरादार व अविनाश सगर यांचा समावेश आहे.
व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे ,प्राचार्य प्रा.रवी मुदकना ,विभाग प्रमुख प्रा.रवींद्र आडेकर ,डॉ. धनंजय खुमणे विभागप्रमुख प्रा.प्रदीप हंगरगेकर , प्रा.वैभव पानसरे प्रा.छाया घाडगे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी विश्वस्त योगेश खरामटे,विश्वस्त आ. राणादादा पाटील ,तहसीलदार सौदागर तांदळे , व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोलहे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रबंधक ,प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
