तुळजापूर प्रतिनिधी
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाई फुले यांची आज १९२ व्या जयंतीचे औचित्य साधून मानवहीत लोकशाही पक्षाच्यावतीने शहरातील सावित्रीबाई फुले प्रशाळेत प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष किरण भाऊ कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सत्यशोधक सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला यावेळी सदाशिव शिंदे, शाहीर गायकवाड, लहू अण्णा शिरसाट,राम शिरसागर, संदीप शिंदे, सुरज डोलारे, कृष्णा गायकवाड, विशाल पारदे, नितीन क्षीरसागर,किसन भाऊ देडे, जयराज क्षीरसागर, सचिन थिटे सह शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते.
