काक्रंबा : पहिलीच ग्रामसभा कोरमअभावी गुंडाळली !

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तालुक्यातील काक्रंबा  येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलीच ग्रामसभा दिनांक 27 जानेवारी रोजी घेण्याची नियोजित केले होते. मात्र कोरम अभावी ग्रामसभा गुंडाळावी लागल्याने उपस्थित ग्रामस्थांन मध्ये तीव्र  संताप  व्यक्त  होते. शुक्रवार दिनांक 27 रोजी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. मात्र ग्रामस्थांची संख्या अगदीच नगण्य होती. ग्रामसेवक वारंवार सदस्यांना विनंती करत होते की लोकांना बोलवा मात्र सरपंचासह  एकाही सदस्याने लोकांना आवाहन करून बोलवले नाही. वास्तविक पाहता ग्रामसभा ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे.

गावच्या पुढील विकासाचे नियोजन, विविध समित्या, गावातील विविध समस्या, नागरिकांच्या समस्या, तक्रारी, कुठली कामे प्राधान्य घ्यावयाची याची धोरण नव्हे तर ते अधिकार ग्रामसभेला दिले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मार्गक्रमण करीत असते. सदर ग्रामसभेचे नियोजन 19 जानेवारीच्या मासिक मीटिंगमध्ये ठरवण्यात आले होते. मात्र सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना ग्रामसभेची माहिती दवंडी, सोशल मीडिया त्याचबरोबर स्पीकरवर पुकारून देणे गरजेचे होते.  4200 ते 4300 लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या गावातून 60 ते 65 नागरिकच ग्रामसभेला उपस्थित राहिल्याने ग्रामसभा गुंडाळावी लागली. मात्र उपस्थित नागरिक आठ दिवसातून दोन ग्रामसभा घेता का म्हणत सत्ताधाऱ्यावर आरोप करत निघून गेले.

यावेळी सरपंच कालिदास खताळ, ग्रा.पं. सदस्य पवन वाघमारे, सुजित घोगरे, सोमनाथ घोगरे, विकास भिसे, नागनाथ खताळ, ग्रामसेवक केवलराम, पोलीस पाटील प्रमोद खताळ, समाधान देवगुंडे, राम घोगरे, उमेश पांडगळे बाळासाहेब मस्के, अहमद आन्सारी,गणपत पाटील, लक्ष्मण धोंगडे ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी सुरवसे, शशिकांत पांडगळे, रोजगार सेवक विनोद साबळे,ऑपरेटर समाधान पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top