प्रतिनिधी चांदसाहेब शेख
७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत , नृत्य , लेझीम व पारंपरिक हलगी वादनाचे लहान वयात उत्कृष्ट सादरीकरण करून अचंबित केले ग्रामस्थांनी इतक्या लहान वयातील बाल विद्यार्थ्यांनी आठच दिवसात केलेल्या तयारीचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या महिला शिक्षिकांचे ज्ञानदानाबरोबर विविध सुप्त कला गुणांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला.
यासर्व विद्यार्थ्यांची तयारी प्रभारी मुख्याध्यापिका हेरकर मॅडम , बचाटे मॅडम , येरटे मॅडम यांनी करून घेतली यामध्ये इयत्ता दुसरीतील पृथ्वीराज जामदार , जुबेर शेख , सार्थक सरडे , अमन फकीर तर तिसरीतील शिवम नवगिरे , सागर हजारे , साहिल शेख , नमन जेटीथोर , जयरुद्र जाधव , उत्कर्ष जांभळे व चौथी वर्गातील इम्रान तांबोळी , श्रेयश स्वामी , प्रणव बचाटे , सागर धुरगुडे , श्रवण माळी , हर्ष जेटीथोर यांनी सहभाग घेतला.
२५जानेवारी रोजी शाळेस धावती भेट दिली असता सहा ते दहा वयोगटातील बाल विद्यार्थ्यांची लेझीम , नृत्य , हलगी वाजवणारा छोटा विद्यार्थी पाहून विशेष कौतुक वाटले खास करून एकही पुरुष शिक्षक कार्यरत नसताना महिला शिक्षिकांची ही तयारी वाखाणण्याजोगी होती.
शिक्षण विस्तार अधिकारी-माने साहेब
देशभक्तीपर गीतांवर नृत्य, लेझीम व पारंपरिक हालगी वाद्य याचे याचे अतिशय सुंदर सादरीकरण व प्रदर्शन पाहून हेवा वाटला त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच महिला शिक्षिका यांचे अभिनंदन व अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण व सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड बाल वयातच विद्यार्थ्यांना परिसरातील शाळेंनी निर्माण करावी ही अपेक्षा.
केंद्रप्रमुख वाले सर
