प्रतिनिधी रजाक शेख
तालुक्यातील काटगाव टेलरनगर व काटगाव देवकुरुळी पिंपळा (खुर्द)-सुरतगाव सावरगाव ते काटी प्र.जि.मा. ३९ या अपूर्ण निकृष्ट डांबरीकरण रस्त्याची चौकशी करण्याचा मागणी साठी रा काँ चे विधानसभा उपाध्यक्ष माजी सैनिक यांनी नववर्ष प्रथम दिनी काटगाव बसस्थानक समोर ऐक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणास विविध संघटना शेतकरी वर्गाने मोठा पाठींबा दिला.
तुळजापूर तालुक्यातील टेलरनगर ते काटगाव व काटगाव ते देवकुरूळी पिंपळा (खुर्द)- सुरतगाव सावरगाव ते काटी या प्र.जि.मा. ३९ या डांबरी रस्ता दुरुस्तीकरन चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण झालेले याचा ञास परिसरातील ग्रामस्थ रुग्ण ,शालेय विद्यार्थी शेतकरी यांना होत आहे. याची चौकशी करण्याचा मागणी साठी एक दिवसाचे उपोषण केले या उपोषणास पंचक्रोषीतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवुन पाठींबा दिला.
