सरपंचाचे निर्णयक मत ठरलं महत्त्वाचे
तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा तडवळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदासाठी आज शुक्रवार दि 6 रोजी पार पडलेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत प्रविण चंदनशिवे या तरूणाची सरपंचाच्या निर्णयक मतांवर उपसरपंचपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून संपूर्ण गावातुन जंगी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
तहसिल कार्यालयाच्या निवडणुक विभागाने जाहीर केलेल्या उपसरपंच पदासाठीच्या तारखेनुसार तालुक्यातील मोर्डा तडवळा ग्रामपंचायत कार्यालयात आज गुरुवार दि 6 रोजी सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवंनियुक्त सदस्यांना बोलवण्यात आले होते यावेळी उपसरपंच पदासाठी निवडून निर्णय अधिकारी एस.डी.भताणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त पद्धतीने मतदान निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपसरपंच पदासाठी राजेंद्र शेंडगे व प्रविण चंदनशिवे यांचे अर्ज आल्याने गुप्त मतदान घेण्यात आले यांमध्ये राजेंद्र शेंडगे व प्रविण चंदनशिवे या दोघांना हि समान मत पडल्याने शेवटी सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे यांचे निर्णयक मतदान घेतल्यानंतर उपसरपंचपदी प्रविण चंदनशिवे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी.भताणे यांनी घोषित केल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्यांची संपूर्ण गावातुन भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढून जल्लोषात साजरा केला.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे उपसरपंच प्रवीण चंदनशिवे सदस्य सविता जाधव आशाबाई कोळेकर यावेळी उपस्थित मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंखे शिवाजी बोधले सज्जन जाधव दिगंबर सरक छत्रगुण गुंड वैजनाथ बेले दादाराव जाधव अंबादास गुंड सुमंत कोळेकर बाबुराव मदने अरुण गुंड सुभाष पाटील बालाजी गुंड हिम्मत बंडगर तुकाराम सुरवसे कचरूद्दीन शेख अंकुश गुंड चंद्रकांत सुरवसे सोमनाथ पांडागळे अमृत कोळेकर प्रवीण गुंड साहेबराव सातपुते भैरवनाथ मस्के बळीराम गुंड दगडू पाटील जिंदावली सय्यद सिंहल गुंड लखन गुंड शंकर गुंड विश्वनाथ गुंड बाबासाहेब चंदनशिवे मनोज मस्के युवराज चंदनशिवे धन्यकुमार चंदनशिवे अजय मस्के,समाधान कोळेकर पांडुरंग कोळेकर जिंदावली सय्यद अविनाश पांडागळे,गणेश जाधव, बबन कोळेकर, रावण पांडगळे,अरविंद चंदनशिवे,ग्रामसेवक अशोक वडकुते आदी उपस्थित होते.
