तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या सरपंच, उपसरपंच व विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व संचालक यांचा जाहीर सत्कार मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता लोहिया मंगल कार्यालय तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक तुळजापूर येथे पार पडली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ शिंदे, धैर्यशील पाटील, महेश चोपदार,शिवसेनेचे श्याम पवार, सुधीर कदम, काँग्रेसचे अमर मगर, बालाजी बंडगर, रामचंद्र ढवळे हे उपस्थित होते.
यापुढील तालुक्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याबाबतही चर्चा झाली असून त्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. समारंभास नूतन सदस्य, सरपंच व उपसरपंच व सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
