महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शेख तर सचिव पदी भुसारे

mhcitynews
0

लोहारा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली करण्यात आली असून लोहारा तालुका अध्यक्षपदी  दैनिक एकमतचे निर्भीड तालुका प्रतिनिधी अब्बास शेख तर सचिव पदी दैनिक जनमत तालुका प्रतिनिधी यशवंत भुसारे व उपाध्यक्षपदी दैनिक गुरूधर्म प्रतिनिधी सुमित झिगांडे यांची एकमताने सर्वानुमते निवड झाल्याने तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे.

31 जानेवारी 2023 रोजी लोहारा शहरांमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मंत्रालय संपर्क प्रमुख अहमद शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा तालुका नुतन कार्यकारणी संदर्भात तातडीने बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या लोहारा तालुका अध्यक्षपदी अब्बास शेख ,उपाध्यक्ष सुमित शिंगाडे, सचिव यशवंत भुसारे, संपर्क प्रमुखपदी महेबुब फकिर, कार्याध्यक्षपदी सुनील ठेले, प्रसिद्धीप्रमुख संभाजी सुरवसे ,संघटकपदी श्रीकांत वडजे, सहसचिवपदी गोपाळ माने, तर सल्लागारपदी मोहन वाघमोडे ,सचिन ठेले यांची निवडी करण्यात आल्या त्यानंतर  लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून नुतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले. व या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top