खानापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध

mhcitynews
0

प्रतिनिधी रजाक शेख 

तालुक्यातील खानापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात 13 जागांसाठी 8 सर्व साधारण, 1 अनुसूचित जाती जमाती, 2 महिला प्रतिनिधी, 1 भटक्या विमुक्त जमाती व 1 इतर मागासवर्गीय या जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. दि. 27 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने त्याच दिवशी 13 जागांसाठी 13 उमेदवार अर्ज दाखल झाले.

अर्जुन राम धुत्ते, मधुकर धोंडिबा गायकवाड, मुबारक इमाम शेख, सुधाकर सदाशिव क्षीरसागर, युसूफ महेबूब पटेल, नागनाथ मारुती धबाले, मारुती त्रिंबक गायकवाड, सरदार महंमदयुसूफ शेख, हे सर्वसाधारण जागांवर, सुरेखा राम सगरे, लक्ष्मी सिद्धाराम जेऊरे हे महिला प्रतिनिधी, अफसर इसाक सय्यद हे इतर मागास प्रवर्ग साठी, महादेव बाळू धुत्ते भटक्या विमुक्त जमाती साठी व गुरुसिद्ध खंडा वाघमारे अनुसूचित जाती साठी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय खानापूर येथे दाखल करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी ए व्ही जाधव यांनी खानापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असे जाहीर केले.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सभापती वसंत वडगावे, युवक नेते अफसर सय्यद, जेष्ठ नागरिक युसूफ पटेल, माजी सरपंच गायकवाड, नसिर पटेल, राजू धुत्ते, इब्राहिम पटेल, मधुकर गायकवाड,बळी वाघमारे, सरदार शेख, सुधाकर क्षीरसागर, विजय वाघमारे यांनी सोसायटी बिनविरोध करण्यासाठी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top