दर्पण दिनी आजाद यंग ग्रुप तर्फे पत्रकार बांधवांचे सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार होय. 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्री जांभेकर यांचे  पहिलं मराठी दैनिक 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

शहरातील आजाद यंग ग्रुप तर्फे दर्पण दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या निपक्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी आजाद यंग चे मोहसीन बागवान, मौलाना मुफ्ती फिरदोस  पठाण, यसुफ शेख, हाजु(भाई) आत्तार, गौस बागवान, रसुल (हाजी) बागवान,  फेरोज पठाण, आरेफ बागवान, वाहेद शेख, आशपाक सय्यद, मतीन बागवान, मुसा नदाफ ,सुमित कदम, अक्रम पठाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top