उस्मानाबाद येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा
उस्मानाबाद प्रतिनिधी
दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात एखादी चांगली गोष्ट झाली असेल आणि ती आपल्या जिल्ह्यात पायलट प्रयोग म्हणून राबवता येत असेल तर ते वेगळे काम करणे मला निश्चित आवडेल. याबाबाबत पत्रकारांनी देखील सूचना सुचवाव्यात व जिल्ह्याच्या विकासासाठी विकासात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळा शुक्रवारी (दि.६) उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर सरचिटणीस संतोष जाधव यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे म्हणाले, सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी प्रशासन अॅक्टीव्ह मोडमध्ये नसते. त्यामुळे प्रशासनास अॅक्टीव्ह मोडमध्ये आणावे लागते. त्यासाठी पत्रकारांची भूमिका देखील महत्वाची असते. कारण पत्रकारांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या ऊनिवा समोर आणल्या तर त्यामध्ये सुधारणा निश्चितपणे करता येतात़ विशेष म्हणजे मी उस्मानाबादला रुजू होण्यापूर्वी अनेकांनी उस्मानाबाद जिल्ह्याविषयी नकारात्मक माहिती सांगितली. मी पदभार स्विकारल्यापासून कामाला प्रारंभ केला असून आजपर्यंत अनेक विधायक व विकासात्मक कामे सुरु आहेत. यापुढे देखील पत्रकार व जनतेच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या परीने शक्य तितके प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ ओम्बासे व पोलीस अधीक्षक श्री़ कुलकर्णी यांनी पत्रकारांशी विविध प्रश्नावर संवाद साधला़ महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींसह मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयाचे नंदकुमार पवार, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, तालुकाध्यक्ष सुभाष कदम (उस्मानाबाद), सुरेशकुमार घाडगे (परंडा), प्रमोद कांबळे (भूम), गौतम चेडे (वाशी), बालाजी वडजे (उमरगा), जिल्हा संघटक दीपक जाधव, प्रशांत कावरे, मल्लिकार्जुन सोनवणे, कैलास चौधरी, उपेंद्र कटके,संतोष शेटे,पत्रकार देविदास पाठक, सुरेश कदम, भागवत शिंदे, पार्श्वनाथ बाळापुरे, शरद गायकवाड, श्रीनिवास भोसले, उमाजी गायकवाड, सल्लाउद्दीन शेख, उत्तम बनजगोळे, सतीश मातणे, किशोर माळी, राहुल कोरे, अजित माळी, लहू पडवळ, बाबुराव पुजारी, आयुब शेख, शहारूख सय्यद, श्रीकांत मटकेवाले, रामेश्वर डोंगरे, पांडुरंग मते, शिला उंबरे, आकाश नरूटे, काकासाहेब कांबळे, संतोष बडवे, संतोष जोशी, बालाजी साळुंके, चंदक्रांत भालेराव, राजेंद्र धावारे, संतोष खुणे आदीसह जिल्ह्यातील पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.
![]() |
पोलीस, जनतेमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न- पोलीस अधीक्षक कुलकर्णी
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस व जनतेमधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सुरक्षीत वातावरण रहावे, याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.महिला सुरक्षा व सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकार प्रशासनाच्या सोबत - पत्रकार रणदिवे
जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे जिल्ह्याच्या विकासासाठी गतीमानपणे काम करीत आहेत. डॉ. ओम्बासे यांनी उस्मानाबाद- तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याचा ४५२ कोटी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेतला आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. ओम्बासे यांच्या कार्यकाळातच सुरू झाले आहे. तडवळे येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा निधीची तरतूद जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहे़ जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकार जिल्हा प्रशासनाच्या सोबत असतील, असे प्रतिपादन पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले.

