तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रगतीत व विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. पत्रकारांच्या सकारात्मक लिखाणामुळे महाविद्यालयाची मोठी प्रगती होत आहे. यापुढेही पत्रकारांनी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व सवलतीच्या शैक्षणिक शुल्काविषयी विषयी सकारात्मक लिखाण करावे असे आवाहन प्राचार्य रवी मुदकना यांनी केले.
दर्पण दिनानिमित्त तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रवी मुद्कना हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून विभाग प्रमुख डॉ. धनंजय खुमणे,प्रा. रवींद्र आडेकर प्रा. वैभव पानसरे व टीपीओ प्रमुख प्रा. छाया घाडगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रा. घाडगे यांनी महाविद्यालयातील विकासाबाबत पत्रकारांचे किती मोठे योगदान आहे तसेच पत्रकारांच्या चांगल्या सहकार्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट होत आहे. यापुढेही टीपीओच्या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी द्यावी अशी विनंती केली. यावेळी जेष्ठ पत्रकार अंबादास पोफळे, डॉ.सतीश महामुनी, श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, सचिन ताकमोघे ,शुभम कदम, संजय कुलकर्णी, संजय गायकवाड ,सिद्धीक पटेल,गोविंद खुरुद, ज्ञानेश्वर गवळी, या पत्रकारांचा प्राचार्य व विभागप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना पत्रकार प्रतिनिधी डॉ. सतीश महामुनी यांनी शहरात होणाऱ्या एज्युकेशन हबसाठी महाविद्यालयाने पुढाकार घ्यावा . महाविद्यालयाच्या प्रवेश सवलती शुल्काचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना. मिळण्यासाठी महाविद्यालयाने याची सर्वांगीण प्रसिद्धी करावी व गरिबातील गरिबांना अभियांत्रिकीचे शिक्षण द्यावे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी प्राचार्य व विभाग प्रमुख यांच्या समवेत विविध शैक्षणिक विषयावर मनमोकळी चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोविंद खुरुद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रबंधक सुजाता कोळी ,कर्मचारी मारुती माने, रमेश कवडे, सतीश गाटे, फुलचंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
