उस्मानाबाद प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यात पानबुडी चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत पाणबुडी मोटारी चोरीचा सिलसिला सुरूच राहिल्याने शेतकऱ्यावर सावधान राहण्याची वेळ आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे पुन्हा विदयुत पानबुडी चोरी गेल्याची घटना घडली असून काक्रंबा येथील- किशोर देविदास गडदे यांच्या तुळजापुर गट क्र. 747 मधील शेतातील पानबुडी विद्युत पंप, केबल, स्टार्टर, ॲटोस्विच असे अंदाजे 9,500 ₹ किंमतीचे साहित्य दि.04.01.2023 रोजी 18.00 ते दि.05.01.2023 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या किशोर गडदे यांनी दि. 06.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी काक्रंबा येथे 29-30 डिसेंबर रोजी मध्यरात्री पानबुडी चोरीची घटना घडली होती.
