वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा...! बेशिस्त वाहनांमुळे भाविकांना त्रास

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी 

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मंदीराकडे जाणाऱ्या  रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. नगरपरिषद पार्किंग ठेकेदाराला ठेका देवुन मोकळे झाले आहे पण वाहतुक कोंडी दूर करण्या बाबतीत कुठलीही उपाययोजना करण्यास तयार नसल्याने याचा सर्वाधिक ञास हा भाविकांन सह शहरवासियांना सह वाहनचालकांना  सहन करावा लागत आहे. 

शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या गल्ल्यांमध्ये नेहमीच ट्रैफिक जामचा अनुभव येतो. शहरातील मंदीराकडे येणारे भवानी रोड महाद्वार रोड शुक्रवार पेठ पाण्याची टाकी हे प्रमुख रस्ते सह मंदीर परिसरात गल्ल्यांतही बारा महिने, चोवीस तास वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असाच प्रश्न पडतो. वाहनतळ ठेकेदार वाहनतळ पावती फाडुन पैसे घेवुन  वाहने आत सोडतात ते वाहने आत सोडले कि वाहनचालकांना  वा-यावर वाहनतळ ठेकेदार सोडतात हे वाहने थेट राजेशहाजी महाद्वार व राजमाता माँ जिजाऊ महाद्वार समोर लागतात त्यामुळे वाहतूक कोंडी मुळे भाविक व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर किरकोळ विक्रेते व्यवसाय करीत असल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. शहरातील काही प्रमुख बाजारपेठा गल्ल्यांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.शहरातील दिपक चौकातुन वाहनतळात जाणारे येणारे वाहने मार्गक्रमण करीत असल्याने  या ठिकाणी नेहमीच ट्रॅफिक जॅम झाल्याचे दिसते. एक तर या परिसरात व्यापारी पेठ, हॉटेल,दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. दोन्ही बाजूंनी वाहने पार्क केल्याने वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी पार्क केलेल्या असतात. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top