जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळची ऐतिहासिक , धार्मिक ठिकाणी सहल

mhcitynews
0


प्रतिनिधी चांदसाहेब शेख

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातील वाचलेले थंड हवेचे ठिकाण, समुद्र, , किल्ले, घाट, डोंगर - दरी,  ध्वनी - प्रतीध्वनी या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष  अनुभव घेता यावा यासाठी 16 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान सहल जाऊन ऐतिहासिक वास्तू व धार्मिक ठिकाणे याठिकाणी भेटी देण्यात आल्या.

धार्मिक ठिकाणे , ऐतिहासिक वास्तू व  समुद्र पाहिल्यानंतर  विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद त्या समुद्रात देखील मावणार नाही एवढा होता असे सहली साठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ  शाळेची  इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील मुला मुलींची शैक्षणिक सहल  महाबळेश्वर ,  प्रतापगड , रायगड ,  रत्नागिरी   ,  कोल्हापूर ( महालक्ष्मी मंदिर )  या ठिकाणांना भेटी देऊन परत आली. विद्यार्थ्यांना महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य  ,प्रतापगडावरील पराक्रम , रायगडवरील विविध वास्तू ,टकमक टोक,हिरकणी बुरुज ,धान्य कोठार,राणी महाल,राजदरबार,शिवसमधी इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर, रत्नागिरी येथील प्रसिद्ध मत्स्य संग्रहालय ,  शाहू राजवाडा  पाहून  मुले आनंदून गेली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  हा अनुभव प्रत्यक्ष देताना शिक्षकांनाही एक वेगळे समाधान लाभत होते. सहलीसाठी  मुख्याध्यापक  चव्हाण सर , जमादार सर , राऊत सर , महामुनी , कापसे ,  पोतदार यांनी  परिश्रम घेतले यावेळी चालक म्हणून  समाधान शिंदे व घन्दूरे यांनी  योग्य रित्या गाडी चालवून  सर्व विद्यार्थ्यांना सहलीचे सुखरुप दर्शन घडवले. 

सहल प्रमुख तथा मुख्याध्यापक चव्हाण सर , जमादार सर , राऊत सर  यांनी सहलीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन विद्यार्थांना ऐतिहासिक ,नैसर्गिक ,सांस्कृतिक , सामाजिक , धार्मिक  स्थळांची माहिती दिली

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top