प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी कापसे यांची निवड

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी धैर्यशील ( आबा ) कापसे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या हस्ते रविवारी दि. 22 जानेवारी रोजी सराया धर्मशाळा तुळजापूर येथे बैठकीत करण्यात आले.

सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून जिल्ह्यात संघटनेचे कार्य वाढवून सामान्य जनतेला नाय देण्याची कार्यपद्धती पाहून त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापुरकर यांनी प्रदेश सरचिटणीस पदावरून थेट प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी काम करीत राहू कोणावर ही अन्याय होऊ देणार नसल्याचे यावेळी कापसे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर महिला राज्याध्यक्ष राणीताई स्वामी, नूतन महिला प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी, तालुकाध्यक्ष गणेश पाटील, निखिल अप्पा अमृतराव, सत्यजित साठे, बालाजीराव जाधव बिल्डर असोसिएशनचे प्रशांतराव अपराध सह असंख्य महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top